Israel Declares State of War: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पुन्हा एकदा लष्करी संघर्षच; गाझा पट्टी रॉकेट हल्ला, विमान हल्ल्यापूर्वी सायरन वाजले
War | Representational image (Photo Credits: pxhere)

Israel Declares State of War: इस्रायल आणि पलेस्टाईन यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही बाजूचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले आहे. इस्रायलच्या सैन्याने गाझाकडून मोठ्या प्रमाणावर केलेल्या हल्ल्याच्या दरम्यान युद्धाची स्थिती घोषित केली आहे. तर, दुसऱ्या बाजूलाहमासचे लष्करी कमांडर मोहम्मद देईफ (Mohammad Deif) यांनी म्हटले आहे की, सशस्त्र गटाने इस्रायलविरुद्ध नवीन लष्करी कारवाई सुरू केली आहे. "ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म" सुरू करण्यासाठी शनिवारी पहाटे इस्रायलमध्ये 5,000 रॉकेट डागण्यात आले. इस्रायलनेही गाझामधून घुसखोरी केल्याची माहिती दिली.

एपी या वृत्तसंस्थेचा हवाला देत आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हमास नेत्याने शनिवारी इस्रायलविरुद्ध नवीन लष्करी कारवाई सुरू केल्याची घोषणा केली आहे. इस्रायलनेही या वृत्ताची पुष्टी करताना, पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझामधून इस्रायलच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. जेरुसलेम पोस्टनुसार, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने जेरुसलेममध्ये सायरन वाजल्याने ते "युद्धासाठी सज्ज" असल्याचे घोषित केले आहे. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, ते गाझा पट्टीतील लक्ष्यांवर हल्ला करत आहेत. काही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, जेरुसलेममध्ये "इस्रायलविरूद्ध नवीन ऑपरेशन" च्या घोषणेदरम्यान हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आहेत. पॅलेस्टिनी समर्थकांनी आज (7 ऑक्टोबर) सकाळी इस्रायलच्या दिशेने डझनभर रॉकेट डागले आणि तेल अवीवपर्यंत हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले, असे वृत्त आहे.

दरम्यान, मोहम्मद देईफ यांनी इस्त्राईलविरोधा उघडलेल्या मोहिमेबद्दल माहिती देणारा संदेश रेकॉर्डींगद्वारे दिला आहे. जो रेडीओ आणि इतर प्रसारमाध्यमांतून प्रसारीत झाला आहे. सांगितले जात आहे की, देईफ यांना ठार मारण्याचा ईस्त्राईलने अनेकदा प्रयत्न केला. पण, इस्त्राईलचे असंख्य प्रयत्न देईफ यांनी उधळून लावले. अद्यापही ते सार्वजनिक ठिकाणी अथवा जाहीरपणे समोर येत नाहीत. आपला संदेश ते नेहमी ध्वनिमुद्रीत करुनच प्रसारीत करतात, असे अलाराबिया न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

द हिंदूने दिलेल्या ऑनलाईन वृत्तात म्हटले आहे की, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, सध्या त्यांचे लक्ष गाझा पट्टी असून तेथेच ते निशाणा साधत आहेत. कारण जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आहेत. जेरुसलेमवरील हल्ला हा इस्रायलकडून मोठा हल्ला मानला जात आहे.

'X' पोस्ट

आंतरराष्ट्री प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, शनिवारी (7 ऑक्टोबर 2023) गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये अभूतपूर्व घुसखोरी केली. ज्यामुळे इस्रायलने संपूर्ण प्रदेशातील रहिवाशांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले. दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये डझनभर रॉकेट डागल्याने ही घुसखोरी झाल्याचा दावा करण्यात येतो आहे.