Population | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

लोकसंख्येच्या बाबतीत भारत लवकरच जगात सर्वात मोठा देश होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत यंदा म्हणजे 2023 मध्येच ही मजल मारु शकतो. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या "स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023 मध्ये हा दावा करण्यात आला आहे. UNFPA च्या हवाल्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबत आकडेवारी जारी केली आहे. UNFPA अहवालात म्हटले आहे की, लोकसंख्येसंबंधी डेटानुसार भारताची लोकसंख्या 1,428.6 दशलक्ष तर चीनची 1.4257 अब्ज इतकी आहे.

चीन आणि भारताच्या खालोखाल युनायटेड स्टेट्स हा तिसरा देश आहे, ज्याची अंदाजे लोकसंख्या 340 दशलक्ष आहे, असा डेटा दाखवतो. दरम्यान, UNFPAच्या आहवालात दिलेली आकडेवारी फेब्रुवारी 2023 पर्यंत उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मागील डेटाचा वापर करून लोकसंख्या तज्ञांनी या महिन्यात भारत चीनच्या मागे जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु जागतिक संस्थेच्या ताज्या अहवालात बदल केव्हा होईल याची तारीख निर्दिष्ट केलेली नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्येच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे की भारत आणि चीनमधून येणार्‍या डेटाबद्दल अनिश्चितता असते. त्यामुळे निश्चित तारीख निर्दिष्ट करणे शक्य नाही. विशेषत: भारताची शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती आणि 2021 मध्ये होणारी पुढील जनगणना कोरोना महामारीमुळे होऊ शकली नाही.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) ही युनायटेड नेशन्स एजन्सी आहे जी लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य, लैंगिक समानता आणि जगभरातील महिला आणि तरुण लोकांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करते. याची स्थापना 1969 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहरात आहे.

ट्विट

UNFPA विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करते, ज्यात कुटुंब नियोजन सेवांचे समर्थन करणे, लिंग-आधारित हिंसाचार रोखणे, महिला आणि मुलींच्या हक्कांचे समर्थन करणे आणि लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य शिक्षणाचा प्रचार करणे समाविष्ट आहे. एजन्सी नैसर्गिक आपत्ती किंवा संघर्षासारख्या संकटाच्या वेळी मानवतावादी सहाय्य देखील प्रदान करते. UNFPA शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) आणि शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा राबवते. चांगले आरोग्य आणि जनकल्याण, लैंगिक समानता यांसठी नागरी समाज संस्था आणि इतर भागीदारांसोबत जवळून काम करते.