चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आपले जगभरात जाळे पसरले आहे. तर अमेरिका, इटलीसह अन्य बड्या देशांत कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक त्याच्या रुग्णांसह बळींचा आकडा वाढत चालला आहे. तर अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून तो चीनच्या लॅब मधून तयार करण्यात आल्याचा वारंवार आरोप करत आहेत. तसेच येत्या वर्षाअखेरीस कोरोनावर लस आणू असा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारतात सुद्धा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर आता भारताने कोविड19 च्या विरोधातील लढाईसाठी मॉरिशसला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे INS केसरी जहाज हे औषध आणि अन्य मदतीसाठी लुईस पोर्ट येथे दाखल झाले आहे.
भारताकडून कोविड19 संबंधित आणि नागरिकांसाठी आयुर्वेदिक औषधे मॉरिशसला पाठवण्यात आली आहे. भारताचे आयएनएस केसरी हे जहाज या सर्व गोष्टी घेऊन तेथे दाखल झाले आहेत. यापूर्वी सुद्धा भारताने अमेरिकेला हायड्रोक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करत मदत केली होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार व्यक्त केले होते. तसेच अमेरिकेकडून भारताला मास्क आणि व्हेटिंलेटरची सोय करुन देण्यात येणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.(Coronavirus Outbreak: जगभरात तब्बल 53 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग; 3 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू)
COVID-19 च्या लढाईत मॉरिशसला मदत म्हणून भारताचे INS केसरी जहाज औषधी आणि इतर मदतीसह पोर्ट लुईसमध्ये दाखल. कोविडशी संबंधित औषधे तसेच नागरिकांसाठी आयुर्वेदीक औषधे भारताने पाठवली आहेत.#BridgesofFriendship#हरकामदेशकेनाम#IndiaFightsCorona @indiannavy pic.twitter.com/xhhAjVVN3U
— PIB in Goa (@PIB_Panaji) May 24, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरसचे जगावर आलेले संकट कधी संपेल कोणालाच माहिती नाही. मात्र त्याच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक देशाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच वैज्ञानिकांकडून सुद्धा कोरोनावर लसी बाबत संशोधन केले जात आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास, एकूण 131868 जणांना त्याचे संक्रमण झाले आहे. तसेच 73560 जणांवर उपचार सुरु असून 3867 जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.