Beirut Blast: लेबनानची राजधानी बेरूतमध्ये झालेल्या स्फोटांत 10 जणांचा मृत्यू; पहा व्हिडिओ
Beirut Blast (PC - Twitter)

Beirut Blast: लेबनानची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या स्फोटांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या स्फोटोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या स्फोटानंतर संपूर्ण आकाशात केवळ धुराचे लोट दिसत होते. हा स्फोट नेमका कसा आणि कशामुळे झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही.

प्राप्त माहितीनुसार, या स्फोटांमुळे शहरातील अनेक इमारंतींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्या असल्याचं वृत्त रॉयटर्स या संस्थेने दिले आहे. (हेही वाचा - Dawn, Pakistan News Channel Hacked: पाकिस्तानची लोकप्रिय वृत्तवाहिनी 'डॉन' झाली हॅक; स्क्रीनवर दिसू लागले भारतीय स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश व तिरंगा (Watch Video))

दरम्यान, बेरूतमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, येथे एकूण दोन स्फोट झाले. यातील एक स्फोट पोर्ट भागात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. तर दुसरा स्फोट शहरात झाला आहे. या स्फोटामुळे दूर-दूरच्या इमारंतींचेदेखील नुकसान झाले.