Hottest Temperature: अमेरिकेच्या Death Valley येथील तापमान 54.4 डिग्री सेल्सियसवर; 107 वर्षानंतर पहिल्यांदा जगातील सर्वात जास्त तापमानाची नोंद
Death Valley (संग्रहित संपादित प्रतिमा)

रविवारी पृथ्वीवरील गेल्या 107 वर्षांतील सर्वात जास्त तापमान (Hottest Temperature) नोंदविण्यात आले. कॅलिफोर्निया (California) मधील डेथ व्हॅली (Death Valley) मध्ये रविवारी तापमान 54.4 डिग्री सेल्सियस (130 Degrees Fahrenheit) वर पोहोचले. अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसने (US National Weather Service) रविवारी दुपारी 3.41 मिनिटांनी हे तापमान नोंदविले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत डेथ व्हॅलीचे तापमान यंदा तीन अंश जास्त नोंदविण्यात आले असल्याचे हवामान सर्व्हिसने ट्विट केले आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील उष्णतेच्या वेगाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे तापमान राष्ट्रीय हवामान सेवेच्या मालकीच्या स्वयंचलित निरीक्षण प्रणालीचा वापर करून, व्हिझीटर्स केंद्राजवळील फर्नेस क्रीकवर मोजले गेले. 'उच्च तापमान प्राथमिक मानले जाते, अधिकृत नाही,' असे राष्ट्रीय हवामान सर्व्हिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे. जर का हे तापमान व्हेरीफाय झाले, तर डेथ व्हॅली येथे जुलै 1913 पासून अधिकृतपणे व्हेरीफाय केलेले हे सर्वात जास्त तापमान असेल. ही आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची घटना असल्याने नोंदवलेल्या तपमानाचा औपचारिक आढावा घेण्याची गरज आहे. एजन्सीने नमूद केले की या तापमानाची वैधता पडताळण्यासाठी समिती स्थापन केली जाईल.

डेथ व्हॅली हे अमेरिकेतील सर्वात खोल व कोरडे ठिकाण आहे आणि उन्हाळ्यात हे  जगातील सर्वात जास्त तापमान असणाऱ्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक बनते. 10 जुलै 1913 रोजी इथले तापमान हे आजपर्यंतचे सर्वोच्च तापमान 56.7 डिग्री सेल्सियस (134 डिग्री फारेनहाइट) पर्यंत पोहोचले होते व जे जगातील सर्वात जास्त नोंदवलेले तापमान आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की 30 जून 2013 रोजी डेथ व्हॅलीमध्ये तापमान 129 फॅरेनहाइट होते. 2016 आणि 2017 मध्ये कुवेत आणि पाकिस्तानमध्ये पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान नोंदले गेले आहे.