Nathan Anderson

Hindenburg Research Shuts Down: अमेरिकन गुंतवणूक संशोधन संस्था आणि शॉर्ट सेलिंग ग्रुप हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) आता बंद होणार आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी बुधवारी ही घोषणा केली. हिंडेनबर्ग हा तोच समूह आहे, ज्यांच्या अहवालामुळे भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांत हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविरुद्ध अनेक मोहिमा सुरू केल्या. 2023 पासून अहवाल प्रसिद्ध करून, हिंडनबर्गने गौतम अदानी यांच्या समूहाचे अनेक अब्ज डॉलर्सचे नुकसान केले आहे. मात्र, अदानी समूहाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

हिंडेनबर्ग रिसर्च बंद होण्याची ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास काही दिवस उरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.  2017 मध्ये सुरू झालेली कंपनी 8 वर्षांपेक्षा कमी कालावधीत बंद होत आहे. बुधवारी फर्मच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या पत्रात अँडरसनने या निर्णयामागे कोणतेही विशिष्ट कारण दिलेले नाही.

कंपनीचे निवेदन-

नॅथन अँडरसनने दीर्घ भावनिक पत्रात त्यांचे संघर्ष, टीमवर्क आणि यशांची माहिती दिली. त्याने सांगितले की, गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याने हा निर्णय आपल्या कुटुंबासह आणि टीमसोबत शेअर केला होता. तो म्हणतो की, ‘आम्ही कंपनीद्वारे ठरवलेली उद्दिष्टे साध्य केल्यानंतर आता ती संपवण्याची वेळ आली आहे. शेवटचे पॉन्झी केस आम्ही नुकतेच पूर्ण केले आहे आणि नियामकांसोबत शेअर करत आहोत.’ (हेही वाचा: Thailand मध्ये आता अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने Casino Gambling ला कायदेशीर मान्यता)

आपल्या संघाचे कौतुक करताना अँडरसन म्हणाला, आम्ही 11 आश्चर्यकारक लोकांचा संघ तयार केला आहे. त्या सर्वांची पारंपारिक आर्थिक पार्श्वभूमी नव्हती, परंतु त्यांची दृष्टी आणि समर्पण आश्चर्यकारक होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यसंघाने अचूकता आणि सत्यतेला प्राधान्य दिले आणि अनेक महत्त्वपूर्ण फसवणूक उघड केली. नॅथन अँडरसनने आपल्या संघातील सदस्यांच्या भवितव्याबद्दल आपले विचार मांडले. तो म्हणाला की त्यांच्या टीममधील काही सदस्य त्यांच्या स्वत: च्या संशोधन संस्था सुरू करतील, तर काही स्वतंत्र एजंट म्हणून काम करतील. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने केवळ अदानी समूहच नाही तर इतर बड्या व्यक्ती आणि संस्थांनाही गोत्यात आणले आहे. या अहवालांमुळे जागतिक वित्तीय बाजारात खळबळ उडाली होती.