दक्षिण कोरियाची (South Korea) राजधानी सेयूलमधील (SEOUL) नाईट-लाइफ (Night Life) एरियात हॅलोवीन (Halloween Festival) साजरा करताना चेंगराचेंगरीत तब्बल 149 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पूढे येत आहे. तरी या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांपेकी बहुतेक किशोरवयीन (Teenagers) आणि 20 वर्षांचे तरुणांचा सामावेश असल्याची धक्कादायक माहिती पूढे येत आहे. सोलच्या इटावॉन जिल्ह्यात झालेल्या झटापटीत आणखी 65 लोक जखमी झाले, असे योंगसान अग्निशमन (Fire Brigade) केंद्राचे प्रमुख चोई सुंग-बीओम यांनी घटनास्थळी दिलेल्या माहिती सांगितलं आहे. जखमींपैकी 19 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. तरी प्रशासनाकडून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

देशाने कोविड निर्बंध (Covid Restrictions) हटवल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर सोलमधील (Seoul) हा पहिला हॅलोविन कार्यक्रम (Halloween Festival) होता. या पार्टीत अनेकांनी मुखवटे आणि हॅलोविनचे पोशाख परिधान केले होते. संध्याकाळी अधिकाधिक वाढत गेली आणि रात्री साडे दहाच्या सुमारास हा चेंगराचेंगरीचा प्रकार घडला असल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Elon Musk on Twitter New Policy: ट्विटरच्या पॉलिसीमध्ये कोणताही बदल नाही; एलोन मस्क यांनी ट्विट करून दिली माहिती)

हॅलोवीन उत्सवादरम्यान (Halloween Festival) चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या पैकी नाईट क्लबमध्ये गेलेल्या मृतांची संख्या अधिक आहे. त्यात वीस वर्ष वयोगटातील महिलांची संख्या अधिक आहे. तरी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस अपयशी ठरल्याची ग्वाही परिसरातील रहिवाशांनी दिली आहे.  तसेच सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत शेकडो लोक अरुंद, उतार असलेल्या गल्लीत चिरडले गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.