Elon Musk on Twitter New Policy: ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीचे आहे. त्याच्या या यशाबद्दल त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खास शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही, तर ट्विटर एलोन यांच्या ताब्यात घेतल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर केले जाईल, असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. त्याचे स्पष्टीकरण देताना आता मस्कने स्वतः ट्विट केले आहे.
इलॉन मस्क यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, ट्विटरच्या धोरणात आतापर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी ट्विटरनेही याला बनावट विधान म्हटले होते. मस्क यांच्याकडे आदेश येताच ट्विटरच्या धोरणातही अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता स्वत: मस्क यांनी याबाबतचे चित्र स्पष्ट केले आहे. (हेही वाचा -UN Security Council Committee: दहशतवादाबाबत UNSC समितीची आज दुसरी बैठक; मुंबईनंतर आता दिल्लीतून होणार पाकिस्तानवर हल्ला)
दरम्यान, ट्विटर एलॉन मस्क यांनी ताब्यात घेतल्यानंतर ट्रम्प यांच्या नावाने एक विधान समोर आले. या निवेदनात इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच ट्रम्प यांनी लिहिले की, "मला ट्विटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे की माझे खाते पुन्हा रिस्टोअर केले जात आहे. सोमवारपर्यंत ते पुन्हा सक्रिय होईल. बघूया काय होते ते."
To be super clear, we have not yet made any changes to Twitter’s content moderation policies https://t.co/k4guTsXOIu
— Elon Musk (@elonmusk) October 29, 2022
तथापी, ट्विटरचे मालक बनताच एलॉन मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल तसेच पॉलिसी चीफ विजया गड्डे यांची हकालपट्टी केली. परागसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातून काढून टाकण्यात आले. या अधिकाऱ्यांमध्ये सीएफओ नेड सेगल यांचाही समावेश आहे. या वर्षी 13 एप्रिल रोजी एलोन मस्कने ट्विटर खरेदीची घोषणा केली होती. त्याने हा प्लॅटफॉर्म $ 44 अब्ज $ 54.2 प्रति शेअर दराने विकत घेतला.