Bill Gates: भारतात कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत(malnutrition in India) आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे बिल गेट्स (Bill Gates)यांनी भारताच्या या प्रयत्नांचे कौतूक केले आहे. 'भारत इतर कोणत्याही देशातील सरकारच्या तुलनेत या समस्येवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. फोर्टिफाइड खाद्यपदार्थांचा वापर मर्यादित करण्यासाठी ते सार्वजनिक अन्न प्रणाली आणि मध्यान्ह भोजन प्रणाली वापरत आहे. परंतु तरीही कुपोषणाची ही एक मोठी समस्या आहे. मी भारताला या समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो.' असे बिल गेट्स म्हणाले. (हेही वाचा:Gadchiroli: गडचिरोलीच्या आदिवासी मुलांची पोषण पातळी सुधारण्यासाठी अभिनव उपक्रम )
गेट्स फाउंडेशनच्या गोलकीपर रिपोर्ट 2024 लाँच करताना एका प्रश्नाला उत्तर देताना, गेट्स म्हणाले की, 'मला वाटते की भारत कदाचित स्वतःला शिक्षणासाठी बी रेटिंग देतो, परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा चांगले काम करण्याचा त्यांचा हेतू आहे. वार्षिक अहवाल शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) विरुद्ध प्रगतीचा मागोवा घेतो. या रिपोर्टनुसार, कुपोषणाच्या आकलनात बरीच सुधारणा झाली आहे, कुपोषणाला आळा घालण्यासाठी गेट्स फाऊंडेशन दरवर्षी निधी देतो.'
बिल गेट्स पुढे म्हणाले की, " कुपोषणाता एक भाग म्हणजे मानवी आतड्याची जटिल प्रणाली समजून घेणे आहे, ज्यामध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात. त्याला मायक्रोबायोम म्हणतात. जर शरिरात जीवनसत्त्वे किंवा प्रथिनांची कमतरता असेल, तर काही मुलांना आतड्यांसंबंधी जळजळ होऊ शकते. ते खात असलेले अन्न अंगी लागत नाही. परिणामी मुलांची वाढ होत नाही." ते म्हणाले की, कुपोषणाची एक शोकांतिका म्हणजे लहान वयातच कुपोषणामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर वाईट परिणाम होतो. बालकांची शारिरीक आणि मानसीक वाढ खुंटते. किंबहूना यात अनकेांचा जीव जातो.
जर तुमचा मेंदू लहान वयात पूर्णपणे विकसित झाला नसेल, तुमची उंची वाढत नसेल, तर तुम्ही पुरेसा योग्य आहार घोतला नाही हे यामागचे कारण आहे. योग्य आहार नसेल तर तुमच्या उंचीमध्ये वाढ होणार नाही. तुमचा मेंदू वाढवा, शक्ती मिळवी किंवा शारिरीक विकास व्हावा यासाठी योग्य आहार गरजेचा आहे.