कोरोना व्हायरसच्या संकटाने जगातील अनेक देश ग्रासले आहेत. कोविड-19 संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असूनही कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1.56 कोटी इतका झाला असून मृतांची संख्या 638,000 इतकी झाली आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, शनिवार 25 जुलै रोजी कोरोना बाधितांचा आकडा 15,668,380 इतका आहे. तर एकूण 638,243 मृतांची नोंद झाली आहे.
CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या अमेरिकत एकूण 4,106,346 रुग्ण आहेत. तर एकूण 145,333 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगात ब्राझीलचा दुसरा कर्मांक लागतो. सध्या ब्राझीलमध्ये एकूण 2,287,475 कोरोना बाधित रुग्ण असून 85,238 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1336861 वर पोहचला असून 31358 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:
अमेरिका | 4,106,346 |
ब्राझील | 2,287,475 |
भारत | 1,336,861 |
रशिया | 799,499 |
दक्षिण आफ्रिका | 421,996 |
पेरु | 375,961 |
मेक्सिको | 378,285 |
चिली | 341,304 |
ब्रिटन | 299,500 |
इराण | 286,523 |
पाकिस्तान | 270,400 |
स्पेन | 272,421 |
इटली | 243,736 |
सौदी अरेबिया | 262,772 |
इटली | 245,590 |
तुर्की | 224,252 |
फ्रान्स | 211,943 |
जर्मनी | 205,623 |
बांग्लादेश | 218,658 |
कोलम्बिया | 226,373 |
अर्जेंटीना | 153,520 |
कॅनडा | 115,115 |
कतार | 108,638 |
इराक | 104,711 |
10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्रिटन (45,762), मेक्सिको (42,645), इटली (35,097), भारत (30,601), फ्रान्स (30,195), स्पेन (28,432), इराण (15,289), पेरु (17,843) आणि रशिया (13,026) यांचा समावेश आहे. दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या दिलासादायक माहितीमुळे संपूर्ण जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.