भारत आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशात मागल 24 तासांत कोरोनाचे 48,916 रुग्ण आढळले आहेत तर 757 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 13 लाख 36 हजार 861 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनाचे एकूण 31,358 रुग्ण मृत्यूमुखी पडल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. काल (24 जुलै) दिवसभरात 32,223 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण 8,49,432 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
भारतात (India) सद्य घडीला 4,56,071 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 57 हजार 117 आढळले आहेत. तर 1 लाख 99 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत 13 हजार 132 जणांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशस्वी ठरली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने( Public Health Department) ने माहिती दिली आहे. COVID-19 रुग्णांसाठी Favipiravir औषध भारतात लाँच करण्यासाठी सिपला कंपनी पूर्णपणे तयारीत
Single-day spike of 48,916 positive cases & 757 deaths in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 13,36,861 including 4,56,071 active cases, 8,49,431 cured/discharged/migrated & 31,358 deaths: Health Ministry pic.twitter.com/HPEz5soYu0
— ANI (@ANI) July 25, 2020
गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण भारत ज्या गोष्टीची वाट पाहात होता ते COVID-19 वरील औषध लवकरच भारतात लाँच होणार आहे. फार्मा कंपनी सिपला फेविपिराविर (Favipiravir) हे औषध भारतात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयारीत असल्याचा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR) ने दावा केला आहे. ही सर्व भारतीयांसाठी दिलासादायक बाब आहे. या अँटी व्हायरल औषधाचे झालेले 3 ट्रायल यशस्वी पार पडल्याचे सांगण्यात येत आहे.