गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण भारत ज्या गोष्टीची वाट पाहात होता ते COVID-19 वरील औषध लवकरच भारतात लाँच होणार आहे. फार्मा कंपनी सिपला फेविपिराविर (Favipiravir) हे औषध भारतात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयारीत असल्याचा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR) ने दावा केला आहे. ही सर्व भारतीयांसाठी दिलासादायक बाब आहे. या अँटी व्हायरल औषधाचे झालेले 3 ट्रायल यशस्वी पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: सौम्य आणि कमी लक्षणे असलेल्या कोविड-19 च्या रुग्णांमध्ये हे औषध गुणकारी ठरले आहे.
कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूपासून आपल्या देशाला वाचविण्यासाठी गुणकारी औषध बनविण्यावर देशभरातील वैद्यकिय तज्ज्ञ, संशोधक गेले कित्येक महिन्यांपासून अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या या परिश्रमाला यश मिळाल्याचे चित्र एकणूच परिस्थितीवरुन दिसत आहे.
Pharma Company #Cipla is all set to launch the anti-viral drug Favipiravir for the treatment of #COVID19 patients. pic.twitter.com/530ZhtHvda
— Prasar Bharati News Services (@PBNS_India) July 23, 2020
Favipiravir हे एक अॅन्टी वायरल औषध आहे. इंफ्लूएंजा वायरस विरूद्ध या औषधाने सकारात्मक परिणाम दाखवले आहेत. जपानमध्ये इंफ्लूएंजा वायरस विरूद्ध हे औषध वापरण्यास परवानगी आहे. दरम्यान ग्लेनमार्क कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायलसाठी देशभरातील 10 महत्त्वाच्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलकडून नोंदणी झाली आहे.
कोरोना व्हायरस बद्दल भारतातील परिस्थितीचा विचार केला असता देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 12,38,635 वर पोहचला आहे. त्यापैकी 4,26,167 सक्रीय रुग्ण असून रुग्ण 7,82,606 कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात एकूण 29,861 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे.