Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जगभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून दिवसागणित कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जगभरात कोरोना बाधितांची संख्या 1.24 कोटी इतकी झाली असून एकूण 559,000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. तर युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, शनिवारी (11 जुलै) सकाळपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा 12,461,962 वर पोहचला असून एकूण 5,59,481 मृतांची नोंद झाली आहे. (Smart Lockdown: कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या 30 शहरांमध्ये स्मार्ट लॉकडाऊन)

CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत एकूण 3,182,385 कोरोना बाधित रुग्ण असून तब्बल 134,073 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये एकूण 1,800,827 कोरोना बाधित रुग्ण असून 70,398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे रशियाला मागे टाकून भारत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारतात एकूण 8,20,916 कोरोना बाधित असून 22,123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनुसार देशांची क्रमवारी पुढील प्रमाणे:

कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:

अमेरिका 3,182,385
ब्राझील 1,800,827
भारत 8,20,916
रशिया 712,863
पेरू 319,646
चिली 309,274
ब्रिटेन 289,678
मेक्सिको 289,174
स्पेन 253,908
इराण 252,720
दक्षिण आफ्रिका 250,687
पाकिस्तान 243,599
इटली 242,639
सौदी अरेबिया 226,486
तुर्की 210,965
फ्रान्स 208,01
जर्मनी 199,332
बांग्लादेश 178,443
कोलम्बिया 133,973
कॅनडा 108,959
कतार 102,630

दरम्यान, 10,000 हून अधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत ब्रिटन (44,735), इटली (34,938), मेक्सिको (34,191),  फ्रान्स (29,896), स्पेन (28,403), भारत (22123), इराण (12,447),  पेरु (11,500) आणि रशिया (11,000)  या देशांचा समावेश आहे.