Smart Lockdown: कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या 30 शहरांमध्ये  स्मार्ट लॉकडाऊन
Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तान (Pakistan) सरकारने देशातील कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी 30 शहरांमध्ये स्मार्ट लॉकडाऊन (Smart Lockdown) करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था सुन्हुआचा हवाला देत आयएएनएसने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशातील कोरोना व्हायरस स्थिती आणि लॉकडाऊन यासंबंधी ही बैठक घेण्यात आली होती.

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रिसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, देशातील कोरोना व्हायरस आणि आर्थिक स्थितीचा विचार करता लॉकडाऊन कसा हटवायचायाबब सरकारने काही ध्येयधोरणे ठरवली. ही धोरणे राबविण्यासाठी स्मार्ट लॉकडाऊन ही संकल्पना अधिक प्रभावी ठरेल असेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. (हेही वाचा, पाकिस्तानात कोरोनामुळे अडकलेले 114 भारतीय नागरिक येत्या 9 जुलैला अटारी-वाघा बॉर्डर मार्गे भारतात येणार)

पंतप्रधान कार्यालयाने पुढे असे म्हटले आहे की, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड रुग्णांसाठी 1500 बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. पुढच्या काही दिवसात आणिखी 1 हजार बेडही वाढविण्यात येतील. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत कोरोना व्हायरस संसर्गामुळे 4922 लोकांचा मृत्यू झाला आहे. दशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या एकूण 2,37,489 इतकीझाली आहे. त्यातील 1,40,965 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.