जगातील अनेक देश कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहेत. दिवसागणित कोरोना बाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत आहे. आजही त्यात भर पडली असून जगतील करोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटींच्या पार गेला आहे. तर एकूण 76900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. शनिवारी सकाळपर्यंत जगातील कोरोना बाधितांचा आकडा 21,377,367 इतका झाला असून 769,652 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) कडून देण्यात आली आहे.
CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या अमेरिकत एकूण 5,529,789 कोरोना बाधित असून मृतांचा आकडा 169,463 इतका आहे. या क्रमावारीत ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये 3,317,096 कोरोना बाधित असून 107,232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (भारताचा कोविड-19 मृत्यू दर 2% हून कमी; एकूण मृतांचा आकडा 49,980- आरोग्य मंत्रालय)
कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:
अमेरिका | 5,529,789 |
ब्राझील | 3,317,096 |
भारत | 2,526,192 |
रशिया | 915,808 |
दक्षिण आफ्रिका | 583,653 |
पेरु | 516,296 |
मेक्सिको | 517,714 |
चिली | 383,902 |
ब्रिटन | 319,208 |
इराण | 341,070 |
पाकिस्तान | 288,047 |
स्पेन | 342,813 |
इटली | 243,736 |
सौदी अरेबिया | 297,315 |
इटली | 253,438 |
तुर्की | 248,117 |
फ्रान्स | 252,965 |
जर्मनी | 224,488 |
बांग्लादेश | 274,525 |
कोलम्बिया | 445,111 |
अर्जेंटीना | 289,100 |
कॅनडा | 123,788 |
कतार | 114,809 |
इराक | 172,583 |
इंडोनेशिया | 137,468 |
फिलिपिन्स | 157,918 |
कझाकस्तान | 102,287 |
इक्वाडोर | 100,688 |
10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये मेक्सिको (42,645), भारत (49980), युके (46,791), इटली (35,392), फ्रान्स (30,410), स्पेन (28,617), पेरु (25,856), इराण (19,492), रशिया (15,585), कोलंबिया (14,492), साऊथ आफ्रिका (11,677) आणि चिली (10,395) यांचा समावेश आहे. दरम्यान अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या लसी विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. त्यामुळे या संकटात एक आशेचा किरण दिसत आहे.