Coronavirus Fatality Rate in India: भारताचा कोविड-19 मृत्यू दर 2% हून कमी; एकूण मृतांचा आकडा 49,980- आरोग्य मंत्रालय
Coronavirus Outbreak | Representational image (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम आहे. रुग्णसंख्येत दिवसागणित मोठी भर पडत असली तरी मृत्यू प्रमाण कमी असल्याची दिलासादायक माहिती समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 चा मृत्यू दर (Covid-19 Fatality Rate) अत्यंत कमी म्हणजे 2% पेक्षा कमी आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचा कोविड-19 मृत्यू दर कमी आहे. जागतिक स्तरावर मृत्यू दर कमी असणऱ्यांपैकी भारत एक देश आहे. अमेरिकेत (USA) 23 दिवसांत 50,000 मृत्यू झाले होते. तर ब्राझील (Brazil) मध्ये 95 आणि मॅक्सिको (Mexico) मध्ये 141 दिवसांत मृतांचा आकडा 50,000 झाला होता. मात्र यासाठी भारताला 156 दिवस लागले आहेत.

ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने आणि प्रचंड लोकसंख्येमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात ठेवणे हे सरकारपुढील मोठे आव्हान होते. मात्र टेस्ट, ट्रॅस आणि ट्रिट या त्रिसुत्रीवर भर देत शासनाने आणि आरोग्य यंत्रणांनी परिस्थिती हाताबाहेर जावू दिली नाही. दरम्यान आतापर्यंत भारतात कोविड-19 तपासणीसाठी एकूण 2,93,09,703 सॅपल टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 7,46,608 चाचण्या कालच्या दिवसांत पार पडल्या आहेत, अशी माहिती ICMR कडून देण्यात आली आहे.

ANI Tweet:

भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 25,89,682 वर पोहचला असून 49,980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत त्यात 63,489 नव्या रुग्णांची भर पडली असून 944 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 18,62,258 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 6,77,444 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.