Coronavirus Update In India: मागील 24 तासात देशात 63,489 नवे कोरोनाबाधित आढळुन आले आहेत यानुसार एकुण कोरोनाबाधितांची संख्या 25,89,682 वर पोहचली आहे. यापैकी 6,77,444 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत तर 18,62,258 जणांंना आजवर डिस्चार्ज देण्यात आलाय. मागील 24 तासात देशात 944 मृत्युंची नोंंद होऊन आजवरच्या एकुण मृतांंचा आकडा 49,980 वर पोहचला आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंंत्रालयाने माहिती दिली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या चाचण्यांंची संख्या सुद्धा दिवसागणिक विक्रम करत वाढवली जात आहे. आयसीएमआर च्या माहितीनुसार मागील 24 तासात देशात शासकीय व खाजगी लॅब्स मधुन एकुण 7,46,608 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यानुसार आजवर झालेल्य COVID 19 टेस्टची संख्या 2,93,09,703 वर पोहचली आहे.
भारताच्या कोरोना परिस्थितीविषयी समोर आलेली आणखी एक आशादायी माहिती अशी की, कोरोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण देशात 2 टक्क्यांहून कमी आहे, जगभराच्या तुलनेत भारतात कोविड 19 विषाणुमुळे होणारा मृत्युदर सर्वात कमी आहे. जिथे अमेरिकेने 23 दिवसात 50,000 मृत्यू, ब्राझील 95 दिवसात आणि मेक्सिकोने 141 दिवसात मृत्यूसंख्या ओलांडली होती. तिथे भारताला यासाठी 1 66 दिवस लागले आणि अजुनही हा आकडा पार झालेला नाही.
ANI ट्विट
Spike of 63,489 cases and 944 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally in the country rises to 25,89,682 including 6,77,444 active cases, 18,62,258 discharged & 49,980 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/55ZQrgdo0P
— ANI (@ANI) August 16, 2020
दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात सांंगितल्या प्रमाणे, देशात कोरोनाची लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. वेगवेगळ्या स्वदेशी लसींंच्या चाचण्या विविध ट्प्प्यात आहेत. या संदर्भात संशोधकांंनी हिरवा कंदील देताच लसींंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व वितरण करण्यासाठी प्लॅन तयार आहे.