Global Coronavirus Update: जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत अव्वल स्थानावर, आतापर्यंत 43 लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असून जगात कोरोना बाधितांची संख्या 3 कोटीच्या पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 9 लाखांच्या पार गेला आहे. जगभरात आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 37 हजार 539 रुग्ण (COVID-19 Positive Cases) आढळले असून 9,65,065 रुग्ण (COVID-19 Death Cases) दगावल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत 2 कोटी 28 लाख 29 हजार 678 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19  Recovered Cases) केली आहे. कोरोना बाधितांचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत (India) दुस-या स्थानावर आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत अव्वल स्थानावर असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत.

भारतात आतापर्यंत 43 लाख रुग्ण बरे झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. जगातील एकूण सर्वाधिक रुग्ण रिकव्हर झालेल्या देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानावर असून याचे प्रमाण 19% इतके आहे. त्यापाठोपाठ अमेरिका (USA), ब्राझील (Brazil), रशिया (Russia), साउथ आफ्रिका (South Africa) देशांत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण 18.70% इतके आहे. COVID 19 Vaccine Update: भारतात कोरोनावरील 30 लसींची चाचण्या सुरु- आरोग्यमंंत्री डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशात कोरोना बाधितांची संख्या 54 लाख 87 हजार 581 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 87,882 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत भारतात 86,961 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 43 लाख 96 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.