COVID 19 Vaccine Update: भारतात कोरोनावरील 30 लसींची चाचण्या सुरु- आरोग्यमंंत्री डॉ. हर्षवर्धन
Union Health Minister Dr. Harsh Vardhan | (Photo Credits: ANI)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsson Session 2020) केंद्रीय आरोग्यमंंत्री डॉ.हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harshavardhan)  यांंनी आज भारतासह जगभरातील कोरोना चाचण्यांंविषयीचे (Coronavirus Vaccine) अपडेट मांंडले आहे. आरोग्यमंंत्री डॉ.हर्षवर्धन यांंच्या माहितीनुसार, जगभरात कोरोनावरील संभाव्य अशा 145 लसींंच्या चाचण्या सुरु आहेत. यापैकी 35 लसी या क्लिनिकल चाचण्यांंच्या टप्प्यात आहेत. इतकेच नव्हे तर भारतात सुद्धा 30 लसींंची चाचणी सुरु आहेत. यातील 3 लसी या क्लिनिकल चाचण्यांंच्या 1,2,3 अशा अ‍ॅड्व्हान्स टप्प्यात आहेत तर 4 लसी या प्री क्लिनिकलच्या अ‍ॅडव्हान्स टप्प्यात आहेत.

डॉ.हर्षवर्धन यांंनी आठवडाभरापुर्वी म्हणजेच 13 सप्टेंबर ला एका ऑनलाईन चर्चेदरम्यान म्हंंटलं होतं की,पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोनाची लस तयार होईल. लस तयार झाल्यानंतर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास मी प्रथम स्वतः ही लस घेईन. ते म्हणाले की जेव्हा ही लस उपलब्ध होईल, तेव्हा सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि अग्रभागी कार्य करणारे कोरोना वॉरियर्स यांना ती दिली जाण्याचा विचार आहे.

ANI ट्विट

दरम्यान, भारतामध्ये सीरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कडून सुरू असलेल्या Oxford-AstraZeneca च्या कोविड 19 वरील संभाव्य लसी मध्यंंतरी थांबवण्यात आल्या होत्या, मात्र नुकतेच या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या DCGI कडून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.