Germany Mass Stabbing (फोटो सौजन्य - X/@ag_Journalist)

Germany Mass Stabbing: शुक्रवारी रात्री पश्चिम जर्मनीतील (West Germany) सोलिंगेन (Solingen) येथे एका उत्सवादरम्यान झालेल्या हिंसक चाकू हल्ल्यात (Knife Attack) तीन जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. रात्री दहाच्या सुमारास हा हल्ला झाला. फ्रॉनहॉफ चौकात अज्ञात गुन्हेगाराने अनेक लोकांवर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर फरार असून त्याच्याबाबत पोलिसांकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. हा हल्ला एकाच व्यक्तीने केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहराच्या 650 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान हा हल्ला झाला. सोलिंगेनचे महापौर टिम-ऑलिव्हर कुर्झबॅच यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याला मानवी जीवनावरील लक्ष्यित हल्ला म्हटले असून अधिकारी या हेतूचा तपास करत आहेत. (हेही वाचा - Employment Opportunities in Germany: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जर्मनी येथे उपलब्ध होणार रोजगारांच्या संधी, जाणून घ्या सविस्तर)

सोलिंगेन उत्सव ट्रॅजेडी -

फ्रॉनहॉफ मार्केट स्क्वेअरजवळ शहराच्या 650 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा हल्ला झाला. हल्लेखोराची ओळख अद्याप पटलेली नसून तो फरार आहे. सोलिंगेनचे महापौर टिम-ऑलिव्हर कुर्झबॅच यांनी एका निवेदनात आपले तीव्र दु:ख व्यक्त केले. (हेही वाचा - Germany Legalises Marijuana: जर्मनी मध्ये 1 एप्रिल पासून गांजा ओढण्याला कायदेशीर परवानगी; पहा नवा नियम काय सांगतो)

जर्मनीतील सोलिंगेन येथे उत्सवात चाकू हल्ला - 

तथापी, राज्याचे गृहमंत्री, हर्बर्ट रीउल यांनी घटनास्थळी भेट दिली. जर्मनीमध्ये चाकू हल्ले आणि इतर हिंसक गुन्हे तुलनेने असामान्य आहेत, परंतु अलिकडच्या वर्षांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.