कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 70 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 13 लाखांहून अधिक नागरिकांना याची लागण झाली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने फ्रान्समध्ये (France) हाहाकार माजवला आहे. फ्रान्समध्ये कोरनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासात 833 लोकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्समध्ये आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे फ्रान्समध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 75 हजार 896 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 13 लाख 58 हजार 857 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय 2 लाख 90 हजार 643 लोक बरे झाले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकड्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सध्या भारतात 4 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- COVID-19: इटलीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद; कोरोनामुळे गेल्या 24 तासात जवळपास 1000 नागरिकांचा बळी
एएनआयचे ट्वीट-
France #coronavirus deaths now exceed 10,000, official: AFP news agency
— ANI (@ANI) April 7, 2020
दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4421 वर पोहचली आहे. यातील 3981 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 326 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केवळ महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 891 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 41 रुग्णांची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली आहे.