Akram Khan (PC - Twitter)

Akram Khan Shot Dead: लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा माजी कमांडर अक्रम खान (Akram Khan) याची गुरुवारी पाकिस्तानात (Pakistan) गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केलं आहे. प्राप्त माहितीनुसार, अक्रम खान याला बाजौर जिल्ह्यात (खैबर पख्तुनख्वा प्रांतात) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. 2018 ते 2020 या कालावधीत एलईटी भर्ती सेलचे नेतृत्व करणारा अक्रम खान पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भाषणे देण्यासाठी प्रसिद्ध होता.

अक्रम खान हा दहशतवादी गटाचा एक सुप्रसिद्ध आणि खास व्यक्ती होता. तो दीर्घकाळापासून अतिरेकी कारवायांमध्ये सामील होता. त्याने एलईटी भर्ती सेलचे नेतृत्व केले आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पठाणकोट हल्ल्यामागील सूत्रधार शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. लतीफ हा पाकिस्तानच्या गुजरांवाला शहरातील भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक होता. 2016 मध्ये पठाणकोट एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसलेल्या चार दहशतवाद्यांचा तो हॅण्डलर होता. (हेही वाचा - Asim Jamil Shot Dead: इस्लामिक विद्वान मौलाना तारिक जमील यांच्या मुलाची पाकिस्तानच्या तालंबा येथे हत्या)

सप्टेंबरच्या सुरुवातीला, अज्ञात बंदुकधारींनी पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोटमधील अल-कुदुस मशिदीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या सर्वोच्च दहशतवादी कमांडरची गोळ्या झाडून हत्या केली होती. रियाझ अहमद उर्फ अबू कासिम असे या दहशतवाद्याचे नाव आहे. रियाझ अहमद कोटली येथून नमाज अदा करण्यासाठी आला होता, त्यावेळी त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती.