Asim Jamil Shot Dead: पाकिस्तानचे प्रसिद्ध इस्लामिक विद्वान मौलाना तारिक जमील यांचा मुलगा असीम जमील यांचे निधन झाले आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा तपास करण्यात पोलीस व्यस्त आहेत. मौलाना तारिक जमील यांनी स्वतः X वर पोस्ट करून मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. तारिक जमील यांचा मुलगा असीम जमील याचा रविवारी पंजाबमधील खानवाल येथे मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, छातीत गोळी लागल्याने असीम जमीलचा मृत्यू झाला. त्याने स्वतःवर गोळी झाडली की कोणी त्याच्यावर हल्ला केला याचा तपास केला जात आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)