डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संकटात पहिल्यांदाच घातला मास्क; आरोग्यसेवा व सैन्यातील अधिकाऱ्यांची घेतली भेट
Donald Trump wearing Mask (Photo Credits: Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे कोरोनाचे (Coronavirus In US) संकट सुरु झाल्यापासून पहिल्यांदा मास्क (Mask) घालून पाहायला मिळाले आहेत. यापूर्वी कोणत्याही प्रसंगी त्यांनी मास्क परिधान केला नव्हता. मात्र अलीकडेच वॉशिंग्टन (Washington) येथील वाल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर येथे ट्रम्प हे कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या व सैन्यातील जवानांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी पहिल्यांदा ट्रम्प यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून पाहायला मिळाले. व्हाईट हाऊस (White House) येथे त्यांनी पत्रकारांना सांगितले की, निदान जेव्हा तुम्ही हॉस्पिटल मध्ये जात असाल तेव्हा तरी मास्क घालणे अनिवार्यच आहेच असे मला वाटते. यानुसार ट्रम्प वाल्टर रीड येथे पूर्ण वेळ मास्क घालून होते मात्र जेव्हा ते हेलिकॉप्टर मधून उतरले तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. जगभरातील COVID19 चा आकडा 12 दशलक्षांच्या पार तर बळींचा आकडा 548,000 वर पोहचला- जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी

डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क घातलेले फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ट्रम्प यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की, डोनाल्ड ट्रम्प हे मास्क घालत नाहीत यामागे एक कारण आहे, ते म्हणजेच "मास्क घातल्याने त्यांना दुबळे असल्यासारखे भासते, तसेच यामुळे लोकांमध्ये कोरोना साठी आणखीन भीती निर्माण होण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास लोकांचे लक्ष भितीकडे अधिक राहील आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी ते उपयुक्त नाही".

पहा ट्विट

दरम्यान, जगभरातील कोरोनाबाधित देशांच्या यादीत अमेरिकेचा क्रमांक अजूनही प्रथम आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 3 दशलक्षांच्या (30 लाख) पार देला आहे. तसेच 131,000 जणांचा अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे.