Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

चीनच्या वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. तर जगभरतील विविध देशात नव्याने कोरोनासंक्रमितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आले आहे. तर जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 दशलक्षांच्या पार गेल्याचे म्हटले आहे. तसेच बळींचा आकडा 548,000 वर पोहचल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.(कोरोना व्हायरस संदर्भात अधिक तपासणीकरता WHO ची टीम पुढील आठवड्यात करणार चीन दौरा)

सद्यच्या घडीला अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 3 दशलक्षांच्या पार देला आहे. तसेच 131,000 जणांचा अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमुळे अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटली असल्याची टीका त्यांच्यावर केली आहे. ट्रम्प यांच्याकडून चीननेच कोरोना व्हायरसची निर्मिती केल्याचा सुद्धा आरोप लगावण्यात आला आहे.(Brain Eating Amoeba: अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये मानवी मेंदूचा नाश करणाऱ्या अमीबाचे नवीन प्रकरण; जाणून घ्या Naegleria Fowleri या गंभीर आजाराविषयी सविस्तर)

दरम्यान, ब्राझील, रुस, स्पेन, युके, इटली, भारत, पेरु, चिली, इराण, मेक्सिको, पाकिस्तान, टर्की, साऊथ अरब आणि साऊथ अफ्रिका येथे कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या पार गेला आहे. तर जर्मनी येथे कोरोना व्हायरसचे 1 लाख 90 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी पाहता भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.