कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात चीनमध्ये (China) पसरलेल्या संसर्गाबाबतची माहिती चीन लपवत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेची (World Health Organisation) टीम पुढच्या आठवड्यात चीनला रवाना होणार आहे. चीनमधील कोविड-19 प्रादुर्भावाची योग्य माहिती मिळवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम चीनला जाणार आहे. या पाहाणी दौऱ्यात कोविड-19 चा उगम झालेले ठिकाण आणि कोविड-19 संसर्ग याची अद्यावत माहिती घेण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाल्याच्या तब्बल सहा महिन्यांनंतर WHO कडून पाहणी करण्यात येणार आहे.
WHO चे डायरेक्ट जनरल Dr. Tedros Adhanom यांनी जानेवारीमध्ये चीनसोबत करार केला असून त्यात असे म्हटले होते की, "कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाचं गांभीर्य पाहता आम्ही लवकरात लवकर तज्ञांची टीम चीनमध्ये पाठवू." दरम्यान कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत जगभरात 5 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत आहे.
WHO चे चीफ सायन्टिस्ट डॉ. सौमय्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरु झालेल्या जागेची खोलवर तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे WHO चे चायनीज सरकारसोबत बोलणे चालू आहे आणि पुढच्या आठवड्यात ही जागतिक आरोग्य संघटनेची टीम चीन दौऱ्यावर जाणार आहे."
ANI Tweet:
WHO team to visit China next week to investigate origins of coronavirus
Read @ANI Story | https://t.co/sh9ltS4FlO pic.twitter.com/CJkG0FZZ8q
— ANI Digital (@ani_digital) July 4, 2020
सध्याच्या परिस्थितीत या व्हायरसबद्दल योग्य पद्धतीने तपास होण्याची गरज आहे. हा व्हायरस कुठे आणि कशाप्रकारे प्राण्यांपासून माणसांपर्यंत आला हे पाहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरस हा थेट वटवाघूळातून माणसांपर्यंत आला की या संसर्गात मध्ये दुसरा प्राणी होता हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. यापूर्वी निपाह हा व्हायरस वटवाघूळांपासून थेट माणसांपर्यंत आला होता. तर सार्सचा संसर्ग वटवागुळातून एका प्राण्याला आणि त्यातून पुढे माणसात पसरला होता. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या उगमाविषयी अधिक तपासणी करणे गरजेचे आहे.