कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक आरोग्य संकटाने जगभरातील बहुतांश देशांना ग्रासले आहे. कोविड-19 (Covid-19) वर अद्याप ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आजही त्यात भर पडली असून जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1.1 कोटींवर पोहचला आहे. तर एकूण 524000 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, शनिवारी (4 जुलै) सकाळपर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 11,047,217 इतकी होती. तर मृतांचा आकडा 524,614 इतका प्रचंड आहे. (Coronavirus in India: मागील 24 तासांत 22,771 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 648315 वर)
CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरस बाधितांच्या संख्येत अमेरिका प्रथमस्थानी आहे. अमेरिकेतील 2,793,425 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 129,432 इतका आहे. तर ब्राझीलमध्ये 1,539,081 कोरोनाग्रस्त रुग्ण असून 61,884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:
अमेरिका | 2,793,425 |
ब्राझील | 1,539,081 |
रशिया | 666,941 |
भारत | 625,544 |
पेरू | 295,599 |
चिली | 288,089 |
ब्रिटेन | 285,787 |
स्पेन | 250,545 |
मेक्सिको | 245,251 |
इटली | 241,184 |
इराण | 235,429 |
पाकिस्तान | 221,896 |
फ्रान्स | 204,222 |
तुर्की | 203,456 |
सौदी अरेबिया | 201,801 |
जर्मनी | 196,780 |
दक्षिण अफ्रीका | 177,124 |
बांग्लादेश | 156,391 |
कॅनडा | 106,962 |
कोलम्बिया | 106,392 |
तर 10,000 हून अधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत ब्रिटन (44,216), इटली (34,833), फ्रान्स (29,896), मेक्सिको (29,843), स्पेन (28,385), भारत (18,213), इराण (11,606) आणि पेरु (10,226) या देशांचा समावेश आहे.