Coronavirus in India: मागील 24 तासांत 22,771 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 648315 वर
Coronavirus in India (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक कायम असून आजही रुग्णसंख्येत मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत कोविड-19 (Covid-19) चे 22,771 नवे रुग्ण आढळले असून 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 648315 वर पोहचला आहे. त्यापैकी 235433 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 394227 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान 18655 रुग्ण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणित वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट 60.80% पोहचला आहे. तर रिकव्हरी रेट आणि मृत्यू दर यांचा प्रमाण 95.48% : 4.52% इतके आहे. असे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसंच कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे प्रयत्नशील असून देशातील राज्य, केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 2.02 कोटीहून अधिक N95 मास्क, 1.18 कोटीपेक्षा जास्त PPE कीट्स, 6.12 कोटीहून अधिक HCQ टॅबलेट्स आणि 11,300 व्हेंटिलेटर्सचे मोफत वाटप करण्यात आले आहे. (महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; पहा तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?)

ANI Tweet:

दरम्यान महाराष्ट्रात कोविड-19 चे संकट दाट असल्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुंबईकरांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई ही शहरं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आली आहेत.