Covid-19 च्या वाढत्या संसर्गामुळे कलम 144 अंतर्गत मुंबई पोलिसांकडून नवी नियमावली जारी; पहा काय आहेत नवीन नियम
Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा मुंबईत कलम 144 (Section 144) म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, घराजवळील दुकानांमध्ये खरेदी करावी. ऑफिससाठी घराबाहेर पडताना आयडी (ID) सोबत ठेवणे आवश्यक आहे. कलम 144 लागू केल्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी गर्दी करणे टाळा. तसंच रात्री 9 ते पहाटे 5 या दरम्यान नाईट कर्फ्यू (Night Curfew) असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नका. मुंबई पोलिस आयुक्तांनी ही माहिती ट्विटच्या माध्यमातून नियमावली शेअर करत दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील हे नवे नियम ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहेत.

विशेष म्हणजे मुंबईकरांना घराजवळील मोकळ्या जागेत वैयक्तिक व्यायामाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पहाटे 5 ते संध्याकाळी 7 या काळात नागरिक घराजवळील मोकळ्या जागेत सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे अशा प्रकारचे व्यायाम करु शकतात. (मुंबई मध्ये आजपासून संचारबंदी लागू; रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बाहेर पडण्यास मज्जाव)

पहा ट्विट्स:

काय आहेत नवे नियम:

# घराजवळील दुकानांमध्ये खरेदी करावी.

# ऑफिससाठी घराबाहेर पडताना आयडी (ID) सोबत ठेवणे आवश्यक आहे.

# कलम 144 लागू केल्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी गर्दी करणे टाळा.

# रात्री 9 ते पहाटे 5 या दरम्यान नाईट कर्फ्यू असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नका.

# पहाटे 5 ते संध्याकाळी 7 या काळात नागरिक घराजवळील मोकळ्या जागेत सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे अशा प्रकारचे व्यायाम करु शकतात.

मुंबईतील कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच हे नवे नियम लागू करत मुंबईकरांना अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी 2 किमी अंतरापलिकडे जाण्यास बंदी घालण्यात आली होती. दरम्यान मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 80699 वर पोहचला आहे. त्यापैकी 50691 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून 4689 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.