मुंबई मध्ये आजपासून संचारबंदी लागू; रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बाहेर पडण्यास मज्जाव
Coronavirus lockdown | Representational Image (Photo Credits: IANS)

मुंबई मध्ये आज (1 जुलै) पासून संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार, रात्री 9 ते पहाटे 5 वेळेमध्ये विनाकारण फिरण्यास,बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. Deputy Commissioner of Police (Operations)  प्रणय अशोक  (Pranaya Ashok) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता रात्रीच्या संचारबंदीमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं, धार्मिक स्थळी भेटणं, फिरणं यासाठीपरवानगी नसेल. मुंबई शहरात कोरोना व्हायरस परिस्थितीचा आढावा घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय गरज असणार्‍यांना यामधून मुभा देण्यात आली आहे. ही संचारबंदी 15 जुलै पर्यंत लागू असेल.

मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी यापूर्वीच 2 किमी अंतरापलिकडे जाण्यास बंदी आहे. त्यासोबतच बाहेर पडताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं, चेहर्‍यावर मास्क घालणं बंधनकारक आहे. आता या नियमांच्या सोबतीने रात्रीच्या वेळेस कलम 144 लावत संचारबंदी देखील लागू करण्याचा निर्णय झाला आहे. Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत 18,653 नवे कोरोनाबाधित रूग्ण; एकूण आकडा 5,85,493 पर्यंत पोहचला.

ANI Tweet

भारताच्या विविध राज्यांसह मुंबईमध्ये 1 जुलै पासून 31 जुलै पर्यंत लॉकडाऊनचा सहावा टप्पा आहे. दरम्यान यामध्ये काही प्रमाणात अनलॉक करत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र सुरू झालेला पावसाळा आणि अनलॉक मधील नागरिकांचा बेशिस्तपणा यामुळे नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढू नये यासाठी आता राज्य सरकार सोबतच, प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली आहे.

Mumbai Lockdown: मुंबईमध्ये १ जुलै ते १५ जुलै पर्यंत संचारबंदी लागू - Watch Video

मुंबईमध्ये काल रात्री आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,  24 तासांत 903 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 77 हजार 197 वर पोहचली आहे. यापैंकी 4 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 44 हजार 170 जणांनी कोरोनावर मात केली आहे.