Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत 18,653 नवे कोरोनाबाधित रूग्ण; एकूण आकडा 5,85,493 पर्यंत पोहचला
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आज कोरोनाबाधितांनी 5 लाख 85 हजारांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज (1 जुलै) मागील 24 तासांमध्ये 18,653 नवे कोरोनाबाधित रूग्ण तर 507 रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5,85,493 पर्यंत पोहचला आहे. तर त्यापैकी 2,20,114 रूग्णांवर उपचार सुरू असून 3,47,979 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 17,400 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्र, दिल्ली शहरात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आता देशामध्ये पावसाळ्याच्या ऋतूला देखील सुरूवात झाल्याने अशा काळात सर्दी, खोकला, ताप हे आजार वाढतात. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ऋतूचक्रातील बदलाच्या काळात नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. अद्याप कोरोनावर कोणतीही ठोस लस, औषधं उपलब्ध नसल्याने आता वैयक्तिक काळजी आणि सोशल डिस्टंसिंग ठेवूनच नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित रहायला शिकावं लागणार आहे.

ANI Tweet

राज्यात काल (30 जून) दिवसभरात 4,878 कोविड रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,74,761 अशी झाली आहे. काल नवीन 1951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 90,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 75,979 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान ठाणे महानगर पालिका हद्द, नाशिक मध्ये पुढील लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.