अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी आठवड्याभरापूर्वी कॅपिटॉल हिल मध्ये केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्या विरूद्ध महाभियोगाचा प्रस्ताव (Impeachment) जारी करण्यात आला आहे. अमेरिकेत सत्तेवर असताना एकाच कारकीर्दीमध्ये दोनदा एखाद्या राष्ट्राध्यक्षाविरूद्ध महाभियोग आणण्याचा ही पहिलीच घटना आहे. दरम्यान 232 लॉ मेकर्स मध्ये 10 रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील महाभियोगाला पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर केला आहे. दोन्ही सभागृहात हा महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्यास डॉनल्ड ट्र्म्प यांना मुदतपूर्वच ट्र्म्प यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागणार आहे. सध्या हा प्रस्ताव कनिष्ट सभागृहात मंजुर झाला आहे. सिनेट मध्येही तो मंजूर झाल्यास ट्र्म्प यांना मुदतपूर्व पद सोडावं लागणार आहे. US: डोनाल्ड ट्रंम्प यांनी अखेर मानला पराभव, 20 जानेवारीला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना सत्ता हस्तांतरित करणार.
अमेरिकेच्या इतिहासात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचार ही अत्यंत क्लेषदायक घटना होती. त्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. आज एकीकडे ट्र्म्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव मंजुर होत असताना दुसरीकडे त्यांनी एक विशेष व्हिडिओ प्रसारित करत कोणत्याही प्रकारच्या राजकीय हिंसाचाराची आपण पाठराखण करत नाही. अमेरिकेत कायद्याचं राज्य आहे. ज्यांचा मागील आठवड्यात कॅपिटॉल हिंसाचारामध्ये सहभाग होता त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असे देखील ट्र्म्प म्हणाले आहेत.
डॉनल्ड ट्रम्प व्हिडिओ
— The White House (@WhiteHouse) January 13, 2021
अमेरिकेच्या हाऊस स्पिकर नॅन्सी पलोसी यांनी महाभियोग प्रस्ताव आल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना कायद्यामपेक्षा कुणीही मोठं नाही. त्याला राष्ट्राध्यक्ष देखील अपवाद नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये ट्र्म्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावेळेस त्यांच्यावर 2 आरोप होते. पहिला, युक्रेनवर 2020 च्या निवडणूकीसाठी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहणारे जो बिडेन यांना बदनाम करण्यासाठी दबाब आणला होता. दुसर्या आरोपात असे म्हटले आहे की, ते कॉंग्रेसला अडथळा आणत होते. मात्र त्यावेळेस त्यांना क्लिन चीट मिळाली होती.