US: डोनाल्ड ट्रंम्प यांनी अखेर मानला पराभव, 20 जानेवारीला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना सत्ता हस्तांतरित करणार
Donald trump & Joe Biden (Photo Credits: ANI)

US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प (Donald Trump) यांनी अखेर त्यांचा निडणूकीत पराभव झाल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर ट्रंम्प यांनी गुरुवारी येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांना सत्तेचे सुव्यवस्थेने हस्तांतरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या संसदेने संयुक्त सत्रात औपचारिक रुपात 3 नोव्हेंबरला झालेल्या निवडणूकीत राष्ट्रध्यक्ष पदासाठी जो बिडेन आणि उपराष्ट्राध्य कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली होती.

डोनाल्ड ट्रंम्प यांच्यासह समर्थकांनी याआधी निवडणूकीत झालेला पराभव मान्य नसल्याचे म्हणत जोरदार आंदोलन ही केली. हे आंदोलन अमेरिकेतील संसद कॅप्टॉल येथे करण्यात आल्यानंतर त्याला हिंसक वळण ही लागले होते. ट्रंम्प यांच्या समर्थकांनी संसद भवानाच्या इमारतीत शिरुन जो बिडेन यांच्या नावावर राष्ट्राध्यक्ष पदाचा शिक्कामोर्बत होऊ नये म्हणून त्यात बाधा आणली. त्यावेळी आंदोलकांनी रोखण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार ही केला गेला.(US Capitol Violence: ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारी आंदोलनात एका महिलेचा मृत्यू; Twitter, Facebook आणि Youtube कडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई)

Tweet:

जो बिडेन हे युनायडेड स्टेस्ट्सचे 46 वे राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. तर रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बिडेन यांच्यामध्ये निवडणूकीतील सामना अत्यंत चुरशीचा झाला. अमेरिकेच्या इतिहासातील अपवादात्मक निवाडणुकांपैकी एक अशी ही निवडणूक ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत काय होणार याबाबत अमेरिकी नागरिक आणि जग श्वास रोखून होते. अखेर निकाल लागला गेला. तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बिडेन यांना 290 तर ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मते मिळाली.