Dogs Can Sniff COVID 19: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार सूरु होताच सर्वात पहिला संशय कुत्र्यांवर आल्याने अनेकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांना सुद्धा निर्दयीपणे रस्त्यात सोडून दिल्याचे आपण पाहिले आहे, त्यानंतर हा व्हायरस कुत्र्यांना काहीही करू शकत नाही असे समोर आले. आता या प्राण्यांशी संबंधितच एक नवा आणि दिलासादायक अभ्यास समोर येत आहे. जर्मन अभ्यासकांच्या माहितीनुसार, कुत्रे हे कोरोना व्हायरसचा गंध ओळखू शकतात असे सिद्ध झाले आहे जर्मन पशु चिकित्सक युनिव्हर्सिटी मध्ये यासंदर्भात तपास करण्यात आला असून कुत्र्यांना प्रशिक्षण दिल्यास ते कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांना त्यांच्या गंधावरून ओळखू शकत असल्याचे दिसून आले आहे. Coronavirus: आता वाघालाही कोरोना व्हायरस बाधा, चाचणी पॉझिटीव्ह; न्यूयॉर्क शहरातील प्राणिसंग्रहालयातील घटना
जर्मन अभ्यासकांनी जर्मन सशस्त्र आर्मी मध्ये कार्यरत आठ श्वानांवर हा अभ्यास केला होता, त्यांना जवळपास पाच दिवस प्रशिक्षण दिल्यावर हे श्वान कोरोनाचा गंध ओळखू शकत असल्याचे दिसून आले होते. या श्वानांना जवळपास 1000 लोकांच्या लाळेचा गंध तपासायला दिला होता. यामध्ये कोरोनाबाधित आणि स्वस्थ रुग्णांच्या लाळेचा समावेश होता. या प्रयोगात 94 टक्के श्वानांनी कोरोनाची अगदी योग्य ओळख पटवली.
श्वानांची वास ओळखण्याची शक्ती ही मानवाच्या तुलनेत अगदी चमत्कारिक रित्या तीव्र असते. यासंदर्भात प्रोफेसर डॉ. होल्गर वोल्क यांनी म्हंटले की, श्वान हे नैसर्गिक रित्या अनेक गोष्टीत मानवापेक्षा अधिक हुशार असतात, त्यांच्या गंध ओळखण्याच्या शक्तीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात, पोलिसांना, आर्मी मध्ये सुद्धा केला जातो. आता समोर आलेली माहिती ही प्राथमिक आहे यात अजूनही खोल तपास करण्याची गरज आहे. जर का हा तपास पूर्णतः परिणामकारक सिद्ध झाला तर सार्वजनिक ठिकाणी कोरोनाबाधितांना ओळखण्यात खूप मदत होईल.