इराण (Iran) लष्करातील कमांडर कासिम सुलेमानी (Qassim Suleimani) यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी झाल्यामुळे 35 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 48 जण जखमी झाले आहेत. आज मंगळवारी कासिम सुलेमानी यांना त्यांच्या मूळ गावी केरमान (Kerman) येथे अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी कासिम सुलेमानी यांनी आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक आले होते. कमांडर कासिम सुलेमानी यांचा इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तेहरान, कोम, मशहद आणि अहवाज येथून लोक केरमानला आले होते. त्यावेळी ही घटना घडली, अशी माहिती इराणच्या शासकीय वाहिनीने ही महिती दिली आहे.
इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दुतावासावर शनिवारी रात्री रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहे. बगदादमध्येअमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. यातच आज कासिम सुलेमानी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. कासिम सुलेमान यांच्यावर संस्कार करण्यासाठी जगभरातून लोक आली होती. यामुळे कासिम सुलेमानी यांच्या मूळ गावी केरमान येथे मोठा जमाव पाहायला मिळाला. दरम्यान त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली. यात 35 जणांचा मृत्यू तर, 48 जण जखमी झाले आहेत. हे देखील वाचा- अमेरिकेच्या हल्ल्याचा इराण घेणार बदला; डोनाल्ड ट्रंप यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 576 कोटी बक्षीस
कमांडर कासिम सुलेमानी यांची हत्या झाल्यानंतर इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्याला बक्षीस देण्याचे ठरवले आहे. जो कोणी डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करेल त्याला या संस्थेकडून 80 दशलक्ष (सुमारे 576 कोटी रुपये) चे बक्षीस देण्यात येणार आहे. कंमाडर सुलेमानी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संस्थेने इराणच्या प्रत्येक नागरिकाला एक डॉलर देण्याचे आवाहन केले होते.