अमेरिकेच्या हल्ल्याचा इराण घेणार बदला; डोनाल्ड ट्रंप यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 576 कोटी बक्षीस
US President Donald Trump, Iranian counterpart Hassan Rouhani (Photo Credits: PTI)

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा (Iran) सेनापती जनरल कासिम सुलेमानी (Major General Qaseem Soleimani) याच्या मृत्यूनंतर, मध्य पूर्व भागात तणाव निर्माण झाला आहे. इराणने आपल्या एलिट कुड्स फोर्सचा कमांडर सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले आहे. तसेच अमेरिकेनेही स्वतःवर होणारा कोणताही हल्ला सहन करणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान, इराणच्या एका संस्थेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना संपवण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी जनरल सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्याला बक्षीस देण्याचे ठरवले आहे.

जो कोणी डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करेल त्याला या संशेकडून 80 दशलक्ष (सुमारे 576 कोटी रुपये) चे बक्षीस देण्यात येणार आहे. जनरल सुलेमानी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संस्थेने इराणच्या प्रत्येक नागरिकाला एक डॉलर देण्याचे आवाहन केले आहे. 'जनरल सुलेमानीचा मारेकरी' ट्रम्प यांच्या शिरच्छेद करणाऱ्याला बक्षीस देण्यासाठी हे पैसे वापरले जातील. ज्या वेळी मसादमध्ये सुलेमानी यांच्यावर अंत्यसंस्कार होत होते, त्यावेळी एका इराणी संस्थेने ही घोषणा केली. (हेही वाचा: अमेरिका-इराण संघर्षात वाढ; इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला; 5 जण जखमी)

इराणमधील बहुतेक सामान्य जनता सतत अमेरिकेविरूद्ध निषेध करत असते. इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ सलग दुसर्‍या दिवशी रॉकेट टाकण्यात आले. रविवारी 'ग्रीन झोन' मध्ये दोन रॉकेट पडल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. गेल्या दोन महिन्यांत अमेरिकन प्रतिष्ठानांना 14 व्या वेळी लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुड्स आर्मीचा कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांचे निधन झाल्यापासून, दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. सुलेमानी यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी बदला घेण्याचा विडा उचलला आहे.