जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सीटीने जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांचा एकूण आकडा जाहीर केला आहे. हा आकडा 1.97 कोटीपेक्षा अधिक आहे. मृतांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. ही संख्या 729,000 पेक्षाही अधिक आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) संचलीत सेंटर फॉर सिस्ट सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) विभाग जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी दैनंदिन जाहीर करत असतो. त्यानुसार या विभागाने सोमवारपर्यंतची आकडेवारीही जाहीर केली. सोमवारी (1 ऑगस्ट 2020) सकाळपर्यंत जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 19,778,566 तर कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 729,692 इतकी होती.
दरम्यान, सीएसएसईने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही अमेरिकेत आहे. अमेरिकेत आजघडीला असलेल्या कोरोना संक्रमितांची संख्या 5,044,435 इतकी झाली आहे. त्यातील 162,919 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा समावेश आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3,035,422 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. त्यातील 101,049 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राजील अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा, Nationalism On Vaccine: लसीबाबत राष्ट्रवाद करणे योग्य नव्हे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा)
जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची देशनिहाय संख्या
- अमेरिका- 5,044,435
- ब्राजील- 3,035,422
- भारत- 2,153,010
- रशिया- 885,718
- दक्षिण अफ्रीका- 559,859
- मेक्सिको- 480,278
- पेरू- 471,012
- कोलंबिया- 376,870
- चिली- 373,056
- ईरान- 326,712
- स्पेन- 314,362
- इंग्लंड- 312,555
- सऊदी अरब- 288,690
- पाकिस्तान- 284,121
- बांग्लादेश- 257,600
- इटली- 250,566
- अर्जेंटीना- 246,499
- तुर्की- 240,804
- फ्रांस- 235,237
- जर्मनी- 217,288
- इराक- 150,115
- फिलीपींस- 129,913
- इंडोनेशिया- 125,396
- कनाडा- 121,362
- कतर- 112,947
दरम्यान, जगभरात दहा हजारांपेक्षा अधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये अमेरिका (162,919), ब्राजील (101,049), मेक्सिको (52,298), इंग्लंड (46,659), भारत (43,379), इटली (35,205), फ्रान्स (30,327), स्पेन (28,503), पेरू (20,844), ईरान (18,427), रशिया (14,903), कोलम्बिया (12,540), दक्षिण अफ्रीका (10,408) आणि चिली (10,077) या देशांचा समावेश आहे.