Nationalism On Vaccine: लसीबाबत राष्ट्रवाद करणे योग्य नव्हे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus. (Photo Credits: Getty Images)

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, कोणत्याही प्रकारच्या लसीवर राष्ट्रवाद करणे योग्य नाही. श्रीमंत राष्ट्रांना अवाहन करताना जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जर ते आपल्याच देशातील नागरिकांवरील उपचारांबाबत अधिक आग्रही राहिले. उपचार करत राहिले तर गरीब राष्ट्रांमधील नागरिक सुरक्षीत राहण्याची इच्छाशक्तीच गमावून बसलतील. डब्लुएचओचे महानिदेशक ट्रोडोस अधनोम ग्रेब्रेयसस यांनी म्हटले आहे की, श्रीमंत देशांनी गरीब देशांना सांभाळून घ्यायला हवे. ग्रेब्रेयसस कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लस संशोधनाबाबत बोलत होते.

द गार्डीयनने दिलेल्या माहितीनुसार ट्रेडोसने म्हटले की, लसीवरुन राष्ट्रवाद करणेय योग्य नाही. अशा प्रकारचा राष्ट्रवाद जगाला मदत करु शकणार नाही. ट्रेडोस यांनी जनेव्हामध्ये डब्लुएचओ मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिकेतील एस्पन सिक्योरिटी फोरमला सांगितले की, जगाला लवकर बरे होण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. कारण हे जागतिक संकट आहे. सर्वांची अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेली आहे. जागातील कोणतेही एका भारातील लोक सुरक्षीत नाहीत. एकतर सर्वजण सुरक्षीत आहेत किंवा कुणीच नाहीत, अशी स्थिती आहे. (हेही वाचा, US: अमेरिकेच्या Arizona राज्यातील तुरूंगातील 500 हून अधिक कैद्यांना कोरोना व्हायरसची लागण )

पुढे बोलताना ग्रेब्रेयसस यांनी म्हटले की, कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव त्या देशांमध्ये कमी होऊ शकतो ज्या देशांकडे सर्व संसाधनं आहेत आणि या संकटाचा सामना करण्यासाठी ते तयार आहेत. एका वृत्तानुसार, जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी संशोधन करत आहेत. आता पर्यंत या विषाणूमुळे 7,00,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.