प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेच्या (US) अ‍ॅरिझोना (Arizona) राज्यातील तुरूंगातील 500 हून अधिक कैद्यांना (Inmates) कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे समोर आले आहे. इथल्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारी अ‍ॅरिझोना सुधार व पुनर्वसन विभाग (ADCRR) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एएसपीसी-टक्सन व्हेस्टोन (ASPC-Tucson Whetstone) कारागृहातील 517 कैद्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. Xinhua वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. या सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी होईपर्यंत आणि ते पुन्हा ठीक होईपर्यंत त्यांना सामान्य जनतेत मिसळू दिले जाणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

एडीसीआरआरने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस साथीच्या रोगाची सुरूवात संपूर्ण राज्यात झाल्यापासून, कोविड-19 च्या सुविधांमधील जोखीम आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. निवेदनात म्हटले आहे की, 'कर्मचारी, कैदी आणि इतर लोकांना सुरक्षित ठेवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.' वॉट्सटोन युनिटमध्ये सध्या 1,066 कैदी आहेत.

(हेही वाचा: जगभरात 1.87 कोटींहून अधिक नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित, मृत्यू 706,000 पार)

अ‍ॅरिझोना आरोग्य सेवा विभागाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील सर्वात जास्त कोरोना विषाणूचा फटका बसलेल्या राज्यांपैकी हे एक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 182,203 कोरोना विषाणू रुग्ण असून, 3,932 मृत्यूंची नोंद झाली आहे. महत्वाचे म्हणजे इथे आतापर्यंत एकही व्यक्त या आजारातून बरी झाल्याची नोंद झाली नाही. याआधी ठाणे कारागृहातील (Thane Jail) एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह वीस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लाझाल्याचे वृत्त मिळाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व लोकांना कोविड केअरच्या विविध केंद्रांमध्ये दाखल केले गेले आहे. कडक लॉकडाऊन असूनही महाराष्ट्रातील तुरूंगातील सुमारे 800 हून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.