Coronavirus: जगभरात 1.87 कोटींहून अधिक नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित, मृत्यू 706,000 पार
coronavirus impacts (Photo Credits: Pixabay)

जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांचा आकडा अद्यापही वाढताच आहे. त्यासोबतच कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येचाही आलेख वाढतो आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची गुरुवारी सकाळपर्यंतची संख्या ही 1.87 कोटीच्याही पुढे तर मृतांची संख्या जवळपास 706,000 इतकी झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) हा विभाग जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या आणि मृतांचा दैनंदिन आकडा जाहीर करत असते.

सीएसएसईच्या ताज्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत जगभराती कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या ही 18,727,530 इतकी तर मृतांची संख्या 706,041 इतकी झाली होती. सीएसएसआय सांगते की, जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची सर्वाधिक संख्या ही अमेरिकेत आहे. अमेरिकेत आजघडीला एकूण 4,821,287 नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित आहेत. तर आजवर कोरोना व्हायरस संक्रमनामुळे 158,171 इतक्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, Facebook, Twitter Remove Donald Trump's Post: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नसल्याचा दावा करणारी पोस्ट Facebook, Twitter ने हटवली)

दरम्या अमेरिकेपाठोपाठ ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राजीलमध्ये 2,859,073 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. तर 97,256 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील देशांतील कोरोना व्हायरस संक्रमतितांची संख्या

 1. अमेरिका- 4,821,287
 2. ब्राजील- 2,859,073
 3. भारत- 1,908,254
 4. रशिया- 864,948
 5. दक्षिण अफ्रीका- 529,877
 6. मेक्सिको- 456,100
 7. पेरू- 439,890
 8. चिली- 364,723
 9. कोलंबिया- 334,979
 10. ईरान- 317,483
 11. इंग्लंड- 307,258
 12. स्पेन- 305,767
 13. सऊदी अरब- 282,824
 14. पाकिस्तान- 281,136
 15. इटली- 248,803
 16. बांग्लादेश- 246,674
 17. तुर्की- 236,112
 18. फ्रान्स- 228,576
 19. अर्जेंटीना- 220,682
 20. जर्मनी- 214,113
 21. इराक- 137,556
 22. कनाडा- 120,033
 23. इंडोनेशिया- 116,871
 24. फिलीपीन्स- 115,980
 25. कतर- 111,805

दरम्यान, 10 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये मेक्सिको (49,698), इंग्लंड (46,295), भारत (39,795), इटली (35,181), फ्रान्स (30,297), स्पेन (28,499), पेरू (20,007), ईरान (17,802), रशीया (14,465) आणि कोलंबिया (11,315) या देशांचा समावेश आहे.