Facebook, Twitter Remove Donald Trump's Post: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नसल्याचा दावा करणारी पोस्ट Facebook, Twitter ने हटवली
President Donald Trump | (Photo Credits: AFP)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) संदर्भात दिशाभूल करणारी पोस्ट फेसबुक (Facebook) आणि ट्विटरने (Twitter) हटवली आहे. AFP रिपोर्टनुसार, या पोस्टमधील माहिती दिशाभूल करणारी असून ती समाजासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे फेसबुकने राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांच्या पेजवरुन हटवली आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने बुधवारी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान अमेरिकेतील शाळा पुन्हा सुरु करण्याचा ड्रम्प यांचा विचार असून केवळ कोविड-19 हॉटस्पॉट असलेली ठिकाणं बंद राहतील, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट हटवण्याची फेसबुकची ही पहिलीच वेळ नाही. पण कोरोना व्हायरस पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे ट्रम्प यांची पोस्ट हटवण्याची ही पहिली वेळ होती.

AFP News Agency Tweet:

 

फेसबुक प्रमाणे ट्विटरने देखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इलेक्शन कॅम्पने अकाऊंट ब्लॉक केले आहे. Fox News इंटरव्हुयमधील व्हिडिओ क्लिप जो पर्यंत रिमूव्ह करत नाही तो पर्यंत त्या अकाऊंटला ट्विट करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. या व्हिडिओ क्लिप मध्ये ट्रम्प यांनी लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नसल्यामुळे शाळा पुन्हा करण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे.

AFP News Agency Tweet:

मागील 24 तासांत अमेरिकेत 1,262 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांचा आकडा 4,818,328 वर पोहचला असून 157,930 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोना बाधितांच्या संख्येत अमेरिका प्रथमस्थानी आहे.