Covid 19 | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. आता अवघ्या काही मिनिटांमध्ये कोरोना व्हायरस ( Covid-19) संसर्गाचे निदान करता येऊ शकते. होय, इंग्लंडमध्ये (England) नुकतीच एक नवी चाचणी (New 90-Minute Test) सादर करण्यात आली. ज्याद्वारे कोरोना व्हायरस संसर्गाचे निदान केवळ 90 मिनिटांत करता येणार आहे.

इग्लंडचे आरोग्य मंत्री मॅट हॅककॉक यांनी म्हटले आहे की, देशात दोन नव्या चाचण्या सादर करण्यात येत आहेत. ज्याद्वारे कोरोना व्हायरस संसर्गाचे निदान अवघ्या 90 मिनिटांत करता येऊ शकणार आहे. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, स्वॅब आणि डीएनए टेस्ट करणे हे खास करुन थंडीच्या काळात विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. सुमारे पाच लाखांहून अधिक स्वॅब चाचणीसाठी पुढच्या आठवड्यात प्रयोगशाळा आणि एडल्ट केअर सेंटरमध्ये उपलब्ध होतील.

यासोबतच ऑक्सफोर्ड नॅनोपोर द्वारा लक्षवदी चाचण्या या वर्षानंतर केल्या जातील. या दरम्यान, शेकडो डीएनए टेस्ट मशीनिंमध्ये सप्टेंबरपासून एनएचएस रुग्णालयांमध्ये उपलब्ध असतील. सध्या हे मशिन लंडनच्या रुग्णालयांमध्ये वापरले जात आहे. आरोग्य विभागाने पुढे म्हटले आहे की, या मशिनद्वारे 90 मिनिटांमध्ये चाचणी पूर्ण करुन निष्कर्षही दिला जाईल. ज्यामुळे कोरोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यास मदत होईल. (हेही वाचा,कोरोना व्हायरस वरील लसीला मान्यता देणारा रशिया ठरु शकतो जगातील पहिला देश; 10 ऑगस्टपर्यंत घोषणा होण्याची शक्यता )

दरम्यान, केवळ 90 मिनिटात कोरोना चाचणी हा प्रयोग जर इंग्लंडमध्ये यशस्वी झाला. तर, लवकरच तो जगभरातही राबवला जाऊ शकतो. भारतालाही त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. कारण भारतातही कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.