कोरोना व्हायरस वरील लसीला मान्यता देणारा रशिया ठरु शकतो जगातील पहिला देश; 10 ऑगस्टपर्यंत घोषणा होण्याची शक्यता
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

रशियाकडून (Russia) येत्या दोन आठवड्यामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लसीला मान्यता मिळू शकते. असे झाल्यास कोरोना व्हायरस लसीला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरु शकतो. 10 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी रशियाकडून कोरोना व्हायरसची लस तयार झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही लस मास्को (Moscow) येथील Gamaleya Institute ने तयार केली आहे. (कोरोनावरील औषध बनवण्यात रशियाने मारली बाजी? सर्व क्लिनिकल चाचणी परीक्षणात लस यशस्वी ठरल्याचा सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा)

CNN च्या रिपोर्टनुसार, रशियामधील कोरोना व्हायरस संकटात काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना ही लस सर्वप्रथम देण्यात येतील. या लसीच्या विकासासाठी Russia's sovereign wealth fund यांच्याकडून आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. Russia's sovereign wealth fund चे किरील दिमित्रीव यांनी या लसीच्या विकासाची तुलना 1957 साली लॉन्च केलेल्या Soviet Union च्या जगातील पहिल्या उपग्रहाशी केली आहे. (जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्या 1.66 कोटींच्याही पुढे)

रशियन शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर रोगांशी लढणाऱ्या लसीमध्ये बदल करुन ही कोरोना व्हायरस विरुद्धची लस तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही लस लवकरात लवकर बनवण्यात यश आले. रशियाचे आरोग्यमंत्री  Mikhail Murashko यांनी सांगितले की, "ही लस टेस्टिंगच्या फेज 3 मध्ये वापरण्यात येईल. कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता अधिक असणाऱ्या म्हणजे वयस्कर मंडळी यांना ही लस सर्वप्रथम उपलब्ध करुन देणे हे प्राधान्य असेल." कोरोना बाधितांच्या क्रमवारीत रशियाचा चौथा क्रमांक लागतो.

सोमवारी, अमेरिकेकडून कोरोना व्हायरस विरुद्धच्या लसीच्या प्लेज 3 टेस्टिंगची घोषणा करण्यात आली. CNN रिपोर्टनुसार, मॉडर्ना कंपनीने ही लस बनवताना MERS व्हायरस विरुद्ध वापरण्यात येणाऱ्या लसीचा वापर केला आहे. MERS हा कोरोना व्हायरस संबंधित व्हायरस असल्यामुळे ही लस कोविड-19 विरुद्ध यशस्वी ठरेल, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.