Coronavirus: कोरोना व्हायसच्या भीतीने जगभरातील Sex Market पडली ओस, सेक्स वर्कर्सवर उपाशी राहण्याची वेळ
Sex Worker | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Corona Virus) संकटाचा परिणाम देशभरातील विविध क्षेत्रांवर होत आहे. जगभरातील सेक्स मार्केट (Sex Market) सुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात आले आहे.  बांग्लादेशमधील सेक्स वर्कर्स तेथील सरकारकडे मदत मागितली आहे. या सेक्स वर्कर्सचे म्हणने असे की, कोरोना व्हायरसमुळे त्यांचा धंदा संपुष्टात आला आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने पुढाकार घेऊन त्यांना मदत द्यावी. वाचकांच्या माहितीसाठी असे की, बांग्लादेशची राजधानी ढाका येथील 'दौलतदिया' हा परिसरत जगभरातील सर्वात मोठ्या वेश्यालयांपैकी एक आहे.

अल जजीरा या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, इथे 15 पेक्षाही अधिक सेक्स वर्कर्स काम करतात. कोरोना व्हायरस संक्रमन संकट देशभर फैलावल्यानंतर इथल्या वेश्यालयांवरही बंदी घालण्यात आली. हे दौलतदिया हे वेश्यालय बांग्लादेशमधील सर्वात मोठे आहे. तसेच, देशात सर्वाधिक सक्रिय आहे. एका रिपोर्टनुसार इथे दररोज किमान 5 हजार लोक आपली वासना भागवण्यासाठी येतात. दरम्यान, याशिवायही देशात इतर ठिकाणी 11 वेश्यालयं आहेत. (हेही वाचा, Fact Check: कोरोनाच्या भीतीने बेल्जीयम मध्ये Group Sex वर सक्तीची बंदी? जाणून घ्या सत्य)

कोरोना संकटावर मात करण्यासाठी बांग्लादेशच्या सरकारने मोठे पाऊल उचलत सर्व वेश्यालयं 5 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारने सेक्स वर्कर्सना 30 किलो गहू, 2000 रुपए आणि एक फ्रीज भाड्याने देण्याचे अश्वासन दिले आहे. मात्र, सरकारने ही मदत तत्काळ द्यावी अशी मागणी केली आहे. सरकारने शक्य तितक्या लवकर मदत द्यावी आम्ही खूपच कठीण स्थितीतून जात आहोत, असे या वेश्यांनी म्हटले आहे.

केवळ बांग्लादेशच नव्हे तर, इतर देशांमध्येही वेश्यांची स्थिती अशीच आहे. जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यूरोपमध्येही सेक्स वर्कर्सची अवस्था प्रचंड वाईट आहे. जर्मनीच्या राजधानीत देह व्यापार आणि नाईट लाईफ गेली प्रदीर्घ काळ चालत आला आहे. बर्लिन येथील Lankwtzer 7 हा वेश्याबाजार ग्राहकांनी भरलेला असे. मात्र आता संपूर्ण युरोप कोरोना व्हायरसने हवालदिल झाला आहे. त्यामुळे इथेही वेश्याबाजारावर बंदी घालण्यात आली आहे.