अमेरिका, जर्मनी मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष सोय; मदतकेंद्रांची यादी जाहीर
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

चीनमधून आता जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस झपाट्याने पसरायला सुरूवात झाली आहे. अशामध्येच आता इटली, स्पेन मध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने आता परदेशात शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमेरिकेमध्ये न्यू यॉर्क, कॅलिफॉर्निया यासारखी शहरं शटडाऊन करण्यात आली आहेत. तसेच भारतामध्ये 22 ते 29 मार्च दरम्यान इंटरनॅशनल कमर्शिअल फ्लाईट्सचं लॅन्डिंग रोखण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक भरतीयांना परदेशात जेथे आहेत तेथेच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन स्थितीमुळे विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही विशेष सोय करण्यात आली आहे. अमेरिका, जर्मनी सारख्या देशांमधील प्रमुख शहरांत भारतीयांना ही सोय देण्यात आली आहे. त्यामुळे जाणून घ्या नेमकी ही मदत केंद्र कुठे व कशी असतील?

अमेरिकेतील भारतीय पर्यटक, विद्यार्थी आणि नागरिकांना कोरोना व्हायरसमुळे अडकून राहिल्याने त्यांचे व्हिसा वाढवून दिले जातील असे सांगण्यात आले आहे. मात्र सुरक्षित रहा असं आवाहन करण्यात आलं आहे. बिल गेट्स यांच्या 'गेट्स फाउंडेशन'कडून जगभरातील कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 कोटी डॉलर ची आर्थिक मदत जाहीर.

न्युयॉर्क मध्ये कुठे असतील मदतकेंद्र ?

जर्मनीमध्ये कुठे असतील मदतकेंद्र?

फिलिपाईंसमधील विद्यार्थ्यांसाठी 

दरम्यान अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आता विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अनेक शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहेत. तर आता चीननंतर युरोप हे कोरोना व्हायरस संसर्गाचं नवं केंद्र बनल्याने आता खबरदारी घेण्यात येत आहे.