बिल गेट्स यांच्या 'गेट्स फाउंडेशन'कडून जगभरातील कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 कोटी डॉलर ची आर्थिक मदत जाहीर
Bill Gates | (Photo Credits: Twitter)

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. या भयानक विषाणुमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी मोठी घोषणा केली आहे. जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 'गेट्स फाउंडेशन'कडून (Gates Foundation) तब्बल 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय बिल गेट्स यांच्याकडून वॉशिंग्टनच्या मदतीसाठी 50 लाख डॉलर देण्यात येणार आहेत. कोरोना रोखण्यासाठी बिल गेट्स यांची ही आर्थिक मदत महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, बिल गेट्स यांनी नागरिकांना कोरोनापासून वाचण्यासाठी काही सुचनाही दिल्या आहेत. शहरातील काही दुकाने तसेच ऑफिस बंद असले तरी काही हरकत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही बिल गेट्स यांनी केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus च्या संकटात पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन; 3 लाख मास्क, 10 हजार प्रोटेक्टीव्ह सूट व 4 मिलियन डॉलर्सची मदत)

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील विकसनशील देशाचे मोठे नुकसान झाले आहे. विकसनशील देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयांची कमतरता आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, असंही बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. याशिवाय बिल गेट्स यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोरोना संदर्भातील पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये बिल गेट्स यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी हातांची स्वच्छता कशी ठेवावी. यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअक केला आहे.