Covid-19 Free Nation: न्यूझीलंड कोरोना व्हायरस मुक्त राष्ट्र; देशांतर्गत सर्व निर्बंध हटवले
Jacinda Ardern | (PC - Facebook)

कोरना व्हायरस (Coronavirus) संकट मुक्त जगातील पहिले राष्ट्र (World's First Covid-19 Free Nation) असा बहुमान मिळविण्यात न्यूझीलंड यशस्वी ठरले आहे. सध्यास्थितीत न्यूझीलंड (New Zealand) देशात कोरोना व्हायरस संक्रमित एकही रुग्ण नाही. त्यामुळे न्यूझीलंडने कोरोना व्हायरस संकट निवारणासाठी लागू केलेले देशांतर्गत सर्व निर्बंध हटवले आहेत. अवघे जग कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे. अद्यापही जगभरातील देशांना कोरना संकटावर उपाय सापडला नाही. असे असताना न्यूझीलंडने मात्र कोरोना मुक्तीमध्ये बाजी मारली आहे.

बीबीसीच्या हवाल्याने वृत्तसंस्था आयएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वळेनुसार 12:00 जीएमटी) न्यूझीलंडने मध्यरात्री फओर लेवल अलर्ट सिस्टममध्ये सर्वात कमी लेवल वनवर चालवण्यात आली. नव्या नियमांनुसार सोशल डिस्टंन्सींग आणि लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याबाबत कोणतीही सीमा नाही. मात्र, विदेशातून देशात येण्यावर मात्र काही निर्बंध कायम आहेत.

विशेष म्हणजे न्यूजीलँडमध्ये गेल्या दोन आठवड्यामध्ये एकाही कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढलला नाही. पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित असलेला एकही रुग्ण आढळला नाही. हे वृत्त देताना पंतप्रधान अर्डन यांनी हलकासा डान्सही केला. जैसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की, आम्ही एका सुरक्षीत आणि मजबूत स्थितीत आहोत. मात्र, कोविड संक्रमन प्रादुरभावापासून दूर जाणे किंवा कोविड 19 विषाणूला देशातून हद्दपार करणे सोपे नाही.