जपान सरकारने कोरोना व्हायरस मुळे संक्रमित होऊन जहाजावर अडकलेल्या लोकांना केले 2 हजार आयफोनचे वाटप
जपान सरकारकडून आयफोनचे वाटप (Photo Credits-Twitter)

जपानच्या सरकारने (Japan Government) डायमंड प्रिसेंस क्रुजवर अडकेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संक्रामित झालेल्या नागरिकांना 2 हजार आयफोनचे वाटप केले आहे. हे जहाज कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर जपानच्या तटावर थांबण्यात आली आहे. वाटप करण्यात आलेल्या आयफोनमध्ये प्री-इन्स्टॉल लाइन अॅप देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मेसेच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधत कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सल्ला घेऊ शकतात. नागरिक जपान मधील चिकित्सक विशेतज्ञांसोबत बातचीत करु शकतात. रिपोर्टच्या मते, जहाजाचे चालक आणि नागरिकांना प्रत्येक केबिन मध्ये कमीत कमी एक फोनची सोय करुन देण्यात आली आहे. डायमंड प्रिंसेस क्रुजवर जवळजवळ 3700 नागरिक अडकले आहेत. यामधील सहा जण हे भारतीय नागरिक आहेत. जहाजात क्रूचे 1100 सदस्य असून त्यापैकी 132 भारतीय आहेत. क्रूझमध्ये कोरोना व्हायरसची लागण 350 लोकांना झाली आहे.

रिपोर्ट्सनुसार, जपानच्या आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालय यांच्यासह विविध मंत्रालयांना 2 हजार आयफफोनचे वाटप केले आहे. आयफोनद्वारे डायमंड प्रिन्सेसवरील प्रवाशांना जपान सरकारने वापरकर्त्याची पुस्तिकादेखील वितरित केली आहे. या मॅन्युअलचा उद्देश लोकांना वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी लाइन अॅपचा कसा वापर करावा हे समजून घेण्यास मदत करणे हा आहे.(Coronavirus: कोरोना विषाणू पसरवल्याचा संशय असणारा स्टिव्ह वॉल्श अखेर सापडला)

Tweet:

9to5Mac च्या अहवालानुसार, जपानबाहेर नोंदणीकृत Google Play-Store आणि App Store कडे लाइन अ‍ॅप डाउनलोड करण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता नाही. आयफोनमध्ये लाइन अ‍ॅप सहज वापरता येतो, जे अँड्रॉइडच्या बाबतीत नाही आहे. भारतीय दूतावासाने ट्विट केले की, "या जहाजात 3 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे.