Boris Johnson (Photo Credits: Getty Images)

कोरोना विषाणूने (Coronavirus)संपूर्ण जगात थैमान घातला आहे. यातच ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर त्यांना ब्रिटेन येथील सेंट थॉमस रुग्णालयात (St Thomas' Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, बोरिस थॉमस यांनी कोरोनाच्या संकटावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharged) देण्यात आले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. यानंतर ब्रिटेनमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने अनेक राजकारण्यांनाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. सध्या कोरोनावर विरुद्ध लढा जिंकण्यासाठी 170 हून अधिक देश प्रयत्न करत आहेत. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच जवळपास 4 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटर अकाउंटवरून आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. अनेक दिवसांनंतरही त्यांच्यात करोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे देखील वाचा- Coronavirus: जगभरातील 52 देशांतील 22 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना COVID-19 संसर्ग- जागतिक आरोग्य संघटना

एएनआयचे ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 8 हजार 447 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 775 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1895 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.