Coronavirus: जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित 1.01 कोटी रुग्ण; मृतांचा आकडा 500,000 पेक्षा अधिक
Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या आता एक कोटीच्याही पुढे गेली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडाही 500,000 पेक्षा अधिक झाला आहे. अमेरिकास्थित जॉन्स हॉपकिंन्स युनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) ही आकडेवारी जाहीर करत असते. सीएएसईने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10,115,912 इतकी झाली होती. तर, मृतांची संख्या 501,233 इतकी होती.

सीएसएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका हा जगभरात सर्वाधिक कोरोना व्हायरस संक्रमित देश म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 2,548,143 इतकी आहे. तर कोरोना व्हायरस संक्रमनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 125,799 इतकी आहे. अमेरिकेपाठोपाठ कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये 1,344,143 रुग्ण कोरोना संक्रमित आहेत. इथे 57622 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. (हेही वाचा, अमेरिका, भारतासह सर्वाधिक फटका बसलेल्या Top 5 देशांची यादी पहा)

जगभरातील देशांची कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी

  1. अमेरिका - 2,548,143
  2. ब्राझिल-1,344,143
  3. रशिया-633,563
  4. भारत- 528,859
  5. इंग्लंड- 312,640
  6. पेरू- 279,419
  7. चिली- 271,982
  8. स्पेन- 248,770
  9. इटली- 240,310
  10. ईरान- 222,669
  11. मेक्सिको-216,852
  12. पाकिस्तान- 202,955
  13. फ्रांस- 199,476
  14. तुर्की- 197,239
  15. जर्मनी- 194,693
  16. सऊदी अरब -182,493
  17. दक्षिण अफ्रीका- 138,134
  18. बांग्लादेश- 137,787
  19. कॅनडा- 105,153

जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड (43,634), इटली (34,738), फ्रान्स (29,781), स्पेन (28,343), मॅक्सिको (26,648), भारत (16,095) आणि ईरान (10,508) या देशांचा समावेश आहे.